News Flash

कोहलीच्या अपयशाची मालिका सुरुच

विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही

बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या यंदाच्या हंगमात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहलीला तीन सामन्यात फक्त १८ धावा करता आल्या आहेत. पहिल्या तीन सामन्याचा विचार केला तर आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीची ही सर्वात खराब कामगिरी आहे.

आयपीएलच्या १३ व्या हंगामात विराट कोहलीने तीन सामन्यात लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. हैदराबाद (१४ धावा), पंजाब(१ धाव) आणि मुंबई(३ धावा) संघाविरोधात विराट कोहली अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने २०१६ मध्ये पहिल्या तीन सामन्यात १८७ धावा काढल्या होत्या. विराट कोहलीच्या पहिल्या तीन सामन्यातील या सर्वाधिक धावा आहेत.

पहिल्या तीन सामन्यात अशी आहे विराट कोहलीची कामगिरी –
२००८ -३७ धावा
२००९ – ६४ धावा
२०१० – ३५ धावा
२०११ -१०६ धावा
२०१२ – ७१ धावा
२०१३ – १६३ धावा
२०१४ – ८० धावा
२०१५ – ७२ धावा
२०१६ – १८७ धावा
२०१७ – १५४ धावा
२०१८ – १०९ धावा
२०१९ – ५५ धावा
२०२० – १८ धावा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 10:44 pm

Web Title: 18 runs in first three games for kohli this ipl his lowest in first three innings of an ipl season nck 90
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : रैनाच्या पुनरागमनाची शक्यता मावळली? CSK ने वेबसाईटवरचा फोटो हटवला
2 IPL 2020 : एबी डिव्हीलियर्सचा मुंबईला दणका, फटकेबाजी करत फिरवला सामना
3 IPL 2020: धोनी, गंभीरनंतर असा पराक्रम करणारा विराट कोहली तिसरा भारतीय
Just Now!
X