22 January 2021

News Flash

Video: IPL 2020चा ‘तो’ नियम अजिंक्यसाठी उघडणार का संधीचं दार?

दिल्ली कॅपिटल्सकडून संधी न मिळालेल्या अजिंक्यसाठी IPL चा एक नियम ठरू शकते संजीवनी

अनेक वर्षे राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून दमदार कामगिरी करणारा मुंबईकर अजिंक्य रहाणे यंदाच्या हंगामात मात्र दिल्लीच्या संघाकडून केवळ बाकावर बसलेला दिसतोय. आतापर्यंत प्रत्येक संघाचे जवळपास ५-५ सामने खेळून झालेत. दिल्लीच्या संघाने धडाकेबाज सुरूवात करत ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे, पण या पाचही सामन्यात अजिंक्यचा समावेश नव्हता. तीन हजारांहूनही अधिक IPL धावा नावावर असणाऱ्या खेळाडूला संघाबाहेर बाकावर बसण्याची वेळ येतेय याचाच अर्थ दिल्लीचा संघ किती भक्कम आहे याचा अंदाज लावता येईल. अशा परिस्थितीत अजिंक्यसाठी स्पर्धेच्या मध्यात एक वेगळीच संधी चालून येण्याची शक्यता आहे. ही संधी नक्की कोणती? त्यामुळे अजिंक्यचा कसा फायदा होईल? आणि इतर एखाद्या संघाची जर्सी परिधान करून अजिंक्य मैदानात उतरताना दिसेल का? असा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ-

IPL 2020 स्पर्धेबद्दलच्या महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 3:01 pm

Web Title: ajinkya rahane dehli capitals mid season transfer rule new start chance for playing xi ipl 2020 vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: ना धोनी, ना रोहित, ना वॉर्नर… ‘हा’ खेळाडू आहे सर्वोत्तम कर्णधार!
2 IPL 2020 : विदेशी खेळाडूच भारतीय संघांचे आधारस्तंभ!
3 कर्णधार धोनीकडून जाधवची पाठराखण
Just Now!
X