04 March 2021

News Flash

तैमूरचा फोटो पोस्ट करत करिनाने विचारलं IPLमध्ये जागा आहे का?? दिल्ली कॅपिटल्सने दिली खुली ऑफर

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीची आश्वासक कामगिरी

आयपीएलचा तेरावा हंगाम सध्या युएईत सुरु आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या स्पर्धेचं आयोजन युएईत केलं. २००८ साली या स्पर्धेला सुरुवात झाली, यानंतर पुढची १२ वर्ष आयपीएलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आयपीएलच्या सामन्यांची क्रेझ असते. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरही आयपीएलचा चाहता आहे.

करिनाने नुकताच तैमुरचा हातात बॅट घेतलेला फोटो सोशल मीडियावर टाकत, आयपीएलमध्ये जागा आहे का?? असा प्रश्न विचारला होता.

 

View this post on Instagram

 

Any place in the IPL? I can play too hahaha love you Tim tim

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिनाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तैमुरचं कौतुक केलं. मात्र संधी साधत दिल्ली कॅपिटल्स संघाने तैमुरला भविष्यात दिल्ली संघाकडून खेळताना पाहायला आवडेल असं म्हणत त्याला खुली ऑफर दिली.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. दुबईच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात करत दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 3:44 pm

Web Title: any place in the ipl kareena kapoor shares taimurs pic delhi capitals respond psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : संघातील सहकाऱ्यांसाठी ड्रिंक्स घेऊन जाण्यात कसली शरम? – इम्रान ताहीर
2 IPL 2020 : विराट कोहलीची अजब मागणी, कर्णधारांना वाईड बॉलसाठी DRS चा पर्याय हवा!
3 Viral Video : …अन् जोफ्रा आर्चर मैदानातच पारंपारिक भारतीय नृत्य करु लागला
Just Now!
X