18 January 2021

News Flash

IPL 2020 : ‘त्या’ विषयावर माझं आणि आश्विनचं एकमत – रिकी पाँटींग

IPL च्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज

आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधी Player Transfer Window च्या मार्फत अनेक खेळाडूंची अदलाबदल झाली. ज्यात गेल्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं नेतृत्व करणारा रविचंद्रन आश्विन यंदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघात गेला आहे. २०१९ च्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात आश्विनने फॉर्मात असलेल्या जोस बटलरला मंकडींग करुन माघारी धाडलं. यानंतर मंकडींग करणं योग्य की अयोग्य यावरुन बराच मोठा वाद झाला होता. यंदा दिल्लीच्या संघाकडून खेळताना प्रशिक्षक रिकी पाँटींगने संघात मी आश्विनला मंकडींग करण्याची परवानगी देणार नाही असं जाहीर केलं होतं. यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली, ज्यात रिकी पाँटींगला आश्विनचं मंकडींग बद्दलचं मत पटलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रिकी पाँटींगने मंकडींग विषयावर माझं आणि आश्विनचं एकमत असल्याचं सांगितलं आहे.

“युएईत दाखल झाल्यानंतर मी आणि आश्विनने या विषयावर एकत्र बसून चर्चा केली. माझ्यामते आमच्या दोघांचंही या विषयावर एकमत आहे. आश्विनच्या मते त्याने केलेली कृती ही नियमाला धरुन होती. किंबहुना त्याच्या बोलण्यात मला तथ्य आढळलं. आमच्या चर्चेत आश्विनने मला एक उदाहरण दिलं ज्यात तो म्हणाला…समजा मी आयपीएलमधला शेवटचा चेंडू टाकत आहे. समोरच्या संघाला विजयासाठी दोन धावांची गरज आहे आणि नॉन स्ट्राईकवरचा खेळाडू चेंडू टाकण्याआधीच क्रिस सोडून पुढे जात आहे तर मी काय करणं अपेक्षित आहे??” पाँटींगने आपल्या आणि आश्विनमधील चर्चेतले मुद्दे जाहीर केले.

आश्विनच्या या स्पष्टीकरणावरही चर्चा होऊच शकते. पण मी त्याला सल्ला दिला आहे की पहिल्यांदा तू फलंदाजाला क्रिस सोडू नको असा सल्ला दे…आणि त्यानंतरही तो ऐकत नसेल तर मंकडींग करुन तू संघाला सामना जिंकवून देऊ शकतोस. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 6:53 pm

Web Title: ashwin and i are on same page ricky ponting on running out non strikers psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: ‘मुंबई इंडियन्स’चा धडाकेबाज फलंदाज दुबईत दाखल
2 IPL 2020 : रसेलला बॉलिंग?? नको रे बाबा…मराठमोळ्या खेळाडूने घेतला धसका
3 VIDEO: विराट ‘हॉट डॉग्ज’ विरूद्ध डीव्हिलियर्स ‘कूल कॅट्स’… पाहा क्रिकेटपटूंचा फुटबॉल सामना
Just Now!
X