News Flash

Video: स्टंप पलटी, चेंडू फरार… डीव्हिलियर्सचा शॉट पाहून विराटलाही फुटलं हसू

तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?

RCBने शारजाच्या मैदानावर सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता संघाचा धुव्वा उडवला. फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची सुरेख गोलंदाजी आणि त्यांना इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या जोरावर RCB ने विजय मिळवला. १९५ धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या KKRच्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. KKR चा संघ केवळ ११२ धावांपर्यंत मजल मारु शकला आणि RCB ने ८२ धावांनी विजय मिळवला. पण या सामन्याचा सामनावीर ठरला तडाखेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स. फिंच-पडीकल जोडीने RCBला चांगली सुरूवात दिली होती, पण डीव्हिलियर्सने संघाला १९४ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७३ धावा कुटल्या. त्याच्या खेळीचे साऱ्यांनीच कौतुक केलं.

डीव्हिलियर्सने सामन्यात लगावलेला एक फटका खूपच चर्चेत राहिला. खेळपट्टी वेगवान नसल्याने चेंडू फटकावणं फलंदाजांना फारसं सोपं जात नव्हतं, पण डीव्हिलियर्सने आल्या-आल्या तिसऱ्याच चेंडूवर जोरदार फटका लगावला. चेंडू सरळ रेषेत जात पहिले नॉन स्ट्राईकजवळच्या स्टंपला लागला. फटका इतका जोरदार होता की चेंडू लागल्यावर स्टंप थेट जमिनीवरच कोसळला. महत्त्वाची बाब म्हणजे त्यानंतर तोच चेंडू पुढे वेगाने सीमारेषाही पार करून गेला. दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग करत असूनही चेंडू सीमारेषेला लागल्यावरच थांबला. त्याचा हा फटका पाहून समोर उभा असलेला विराटही हसू लागला.

पाहा तो मजेशीर फटका-

सामन्यानंतर डीव्हिलियर्सबद्दल विराट म्हणाला…

“मी जेव्हा खेळायला आलो तेव्हा थोडे चेंडू खेळून फटकेबाजी करावी असा माझा विचार होता. पण डीव्हिलियर्सने अप्रतिम खेळ करायला सुरूवात केला. तिसऱ्या चेंडूपासूनच त्याने फटकेबाजीला सुरूवात केली होती. मी त्याला जाऊन विचारलं तेव्हा तो मला म्हणाला की त्याला खेळताना काहीही समस्या जाणवत नाहीये. जे त्याने केलं ते फक्त तोच करू शकला असता. खेळपट्टीवर अजिबात ओलावा नव्हता. त्यामुळे फलंदाजीला उतरलो तेव्हा आमच्या डोक्यात १६५ धावांचा टप्पा गाठण्याचा विचार होता, पण त्याचे १९४ कसे आणि केव्हा झाले ते आपण पाहिलंच. ते सारं खरंच अविश्वसनीय होतं”, अशा शब्दात विराटने डीव्हिलियर्सच्या खेळीची स्तुती केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 6:31 pm

Web Title: comedy batting video ab de villiers bullet straight boundary hit hard on stumps goes for four enough power virat kohli laugh smile on ground ipl 2020 rcb vs kkr vjb 91
टॅग : IPL 2020,Virat Kohli
Next Stories
1 IPL 2020 : CSK च्या रंगात रंगलंय त्याचं घर, पाहा कसं आहे धोनीच्या चाहत्याचं खास घर
2 IPL 2020: एबी डीव्हिलियर्सची खेळी Superhuman- विराट कोहली
3 IPL 2020: युवराजचं चहलला मजेशीर उत्तर, म्हणाला “लगता है मैदान पर…”
Just Now!
X