26 October 2020

News Flash

VIDEO: अजब गजब सिक्सर! विल्यमसनचा फटका पाहून कार्तिक, मॉर्गनही अवाक

शिवम मावीच्या गोलंदाजीवर लगावला सिक्सर

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत १६० पार मजल मारली. कोलकाताचे आजी-माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन या जोडीने शेवटच्या काही षटकांत दमदार फटकेबाजी करत संघाला १६३ धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांची अर्धशतकी भागीदारी कोलकातासाठी महत्त्वाची ठरली.

१६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने फलंदाजीच्या क्रमात बदल केले. केन विल्यमसनला जॉनी बेअरस्टोसोबत सलामीला पाठवण्यात आले. या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. सामन्यात विल्यमसनने शिवम मावीच्या गोलंदाजीवर एक विचित्र षटकार लगावला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल्यमसनने मागच्या दिशेला षटकार खेचला. चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. त्याचा हा फटका पाहून कार्तिक आणि मॉर्गनदेखील अवाक झाल्याचं दिसून आलं.

त्याआधी, नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाकडून राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल या दोघांनी तडाखेबाज सुरूवात केली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्यांनी ४८ धावा झोडल्या. पण पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर त्रिपाठी त्रिफळाचीत झाला. त्याने २३ धावा केल्या. शुबमन गिल आणि नितीश राणाने फटकेबाजी केली. पण गिल ५ चौकारांसह ३६ धावांवर तर नितीश राणा ३ चौकार व एका षटकारासह २९ धावांवर बाद झाला. धोकादायक आंद्रे रसल आजही स्वस्तात (९) बाद झाला. त्यानंतर संघाचे आजी-माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी शेवटपर्यंत तळ ठोकला. ३० चेंडूत या दोघांनी ५८ धावांची भागीदारी केली. कार्तिकने २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २९ धावा केल्या. तर इयॉन मॉर्गनने 3 चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 6:57 pm

Web Title: comedy video kane williamson sixer batsman rock morgan karthik shocked ipl 2020 srh vs kkr vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO: हवेत उडालेला चेंडू झेलण्यासाठी राशिद खान धावत येऊन मैदानातच बसला अन्…
2 IPL 2020 : तुमचे केस भारी, तुमची पोझ भारी ! अंपायर पश्चिम पाठकांवर नेटकरी फिदा
3 IPL 2020: कार्तिक-मॉर्गनची तुफान फटकेबाजी; कोलकाताची १६०पार मजल
Just Now!
X