News Flash

Video: भर मुलाखतीत अचानक निता अंबानी आल्या अन्…

व्हिडीओ पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर

IPL 2020 FINAL: IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

मुंबईने सामना जिंकल्यानंतर विविध खेळाडूंच्या मैदानावरच छोट्या मुलाखती सुरू होत्या. क्विंटन डी कॉक आणि नॅथन कुल्टर-नाईल हे दोघे जण मुलाखतीसाठी उभे होते. अँकर सायमन डुल स्टुडिओमधूनच त्यांना प्रश्न विचारत होता. डी कॉक प्रश्नाचं उत्तर देत असतानाच अचानक मुलाखतीत मुंबई इंडियन्सच्या मालकीण निता अंबानी आल्या. आपल्या संघातील खेळाडूंना भेटण्यासाठी त्या या दोघांजवळ आल्या आणि क्विंटन डी कॉकला पाहून त्यांनी त्याचं अभिनंदन केलं. परंतु, काही क्षणातच त्यांना मुलाखत सुरू असल्याचं समजलं. त्यानंतर मात्र निता अंबानी चटकन तिथून निघून गेल्या.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2020 3:23 pm

Web Title: comedy video nita ambani mistakenly crashes quinton de kock interview after mumbai indians victory watch vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 जेव्हा रवी शास्त्री बीसीसीआयच्या अध्यक्षांनाच विसरतात तेव्हा…
2 मुंबईच्या फलंदाजांचा विक्रम; IPLच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
3 IPL 2020 : सूर्यकुमारला संघात स्थान न देणं ही KKR ची सर्वात मोठी चूक – गौतम गंभीर
Just Now!
X