News Flash

IPL 2020 : विराटचा खराब फॉर्म ठरू शकतो RCB साठी चिंतेचा विषय

जाणून घ्या, आकडेवारी काय सांगते...

आरसीबीचं नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. या संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. २००९ आणि १०१६ मध्ये या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विराट कोहलीने वर्षाभरासाठी १७ कोटी रुपयांचा करार केला आहे. इतर कर्णधारापेक्षा ही रक्कम जास्त आहे.

भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन हे युएईत केलं आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. सर्व संघ सध्या युएईत कसून सराव करत आहे. विराट कोहलीचा RCB संघ ही तेराव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही वर्षांतली RCB ची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. एकदाही विजेतेपद न जिंकू शकलेली RCB यंदा अनुभवी खेळाडूंच्या सहाय्याने मैदानात उतरेल.

याआधीही २०१४ साली विराटचा RCB संघ युएईत ५ सामने खेळला होता. ज्यातील दोन सामन्यांत RCB ने विजय मिळवला. परंतू संघासाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार विराट कोहलीची या सामन्यांमधली कामगिरी फारशी चांगली नव्हती. युएईतील ५ सामन्यांमध्ये विराटच्या नावावर फक्त १०५ धावा जमा आहेत. २०१८ आशिया चषकाचं आयोजन युएईत करण्यात आलं होतं. मात्र या स्पर्धेतही विराटला विश्रांती देण्यात आलेली होती. त्यामुळे युएईच्या मैदानांवर विराट कोहली प्रदीर्घ काळाने खेळणार आहे. अशा परिस्थितीत त्याचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय ठरु शकतो.

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे RCB कडून पार्थिव पटेलने युएईत खेळलेल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर ११८ धावा जमा आहेत. मात्र यंदा RCB चं प्रशासन एबी डिव्हीलियर्सकडून यष्टीरक्षण करवून घेण्याच्या विचारात असल्यामुळे पार्थिव पटेलला संघात जागा मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे.

पार्थिव पटेलने गेल्या हंगामात RCB कडून १४ सामने खेळले, ज्यात त्याच्या नावावर ३७३ धावा जमा आहेत. मात्र यंदा RCB संघ व्यवस्थापन ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच आणि पडीक्कल यांना सलामीला संधी देण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 4:26 pm

Web Title: do you know who is royal challengers bangalore highest run scorer in uae psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 ….तर मला संघाबाहेर बसवलं असतं- शेन वॉटसन
2 करोनावर मात करून दीपक चहर CSKच्या ताफ्यात दाखल, पाहा PHOTO
3 Video : गुड लेंग्थवर बॉलिंग कर…हिटमॅनचा सल्ला आणि मराठमोळ्या दिग्विजय देशमुखची कमाल
Just Now!
X