28 October 2020

News Flash

Video : सरावादरम्यान रसेलची फटकेबाजी, कॅमेऱ्याची काच फोडली

KKR चा सलामीचा सामना मुंबईविरुद्ध

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली असून आतापर्यंत ३ सामने पार पडले आहेत. मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात चेन्नईने, दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात दिल्लीने तर बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामन्यात बंगळुरुने विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पहिला सामना २३ तारखेला मुंबई इंडियन्ससोबत रंगणार आहे. या सामन्यासाठी कोलकात्याचे खेळाडू सध्या कसून सराव करत आहेत. काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल कोलकाता संघात दाखल झाला आहे.

नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना रसेलने काही उंच फटके खेळले. याचवेळी नेट्समध्ये लावलेल्या कॅमेऱ्यालाही रसेलच्या फटकेबाजीचा बळी व्हावं लागलं. रसेलचा एक फटका थेट कॅमेऱ्याच्या काचेवर जाऊन आदळला आणि त्या कॅमेऱ्याचा चक्काचूर झाला. कोलकाता नाईट रायडर्सने याचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळत असताना मुंबईचा संघ पुनरागमन करण्याच्या तयारीत असेल. तर दुसरीकडे मॉर्गन, रसेल आणि इतर तरुण खेळाडूंच्या जोरावर दिनेश कार्तिकचा KKR संघ पहिल्याच सामन्यात विजय मिळवून चांगली सुरुवात करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 3:32 pm

Web Title: dre russ storm loading kkr batsmans shot in nets shatters camera glass during net session psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : SRH च्या अडचणी वाढल्या, मिचेल मार्श संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्यता
2 Video : दुहेरी धाव घेताना हैदराबादच्या खेळाडूंची मैदानात टक्कर, विकेटही गमावली
3 Video : फॅन्सी शॉट खेळायला गेलेला प्रियम गर्ग फसला, हेल्मेटला लागून बॉल थेट स्टम्पवर
Just Now!
X