26 October 2020

News Flash

IPL 2020: ‘सुपर ऐतिहासिक’… पहिल्यांदाच एका दिवसात झाल्या तीन Super Over

क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एकाच सामन्यात खेळण्यात आल्या २ सुपर ओव्हर

IPL ही स्पर्धा कायमच रोमांचक असते. या स्पर्धेचे हे १३वे वर्ष आहे. आतापर्यंत या स्पर्धेत अनेक अटीतटीचे सामने झालेले आहेत. काही सामन्यात अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगताना चाहत्यांनी पाहिले आहेत, तर काही सामने बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरचा थरारदेखील साऱ्यांना पाहायला मिळाला आहे. पण IPLच्या इतिहासात एक गोष्ट पहिल्यांदाच घडली. रविवारच्या दिवशी दोन सामने खेळवले जातात. त्यानुसार आज दोन सामने पार पडले आणि IPL च्या इतिहासात महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. इतकेच नव्हे तर IPLच्या आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्यात दोन सुपर ओव्हरही रंगल्या. रविवारच्या दिवशी एकूण ३ सुपर ओव्हरची मेजवानी क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाली.

आजच्या दिवसातील पहिला सामना कोलकाता आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये रंगला. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात कोलकाताच्या संघाने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजय मिळवला. कोलकाताने २० षटकांत १६३ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर कोलकाताच्या लॉकी फर्ग्युसनने ३ चेंडूत २ धावा देत २ बळी घेतले आणि हैदराबादचा डाव संपवला. त्यामुळे कोलकाताने ३ धावा करत सहज सामना जिंकला.

त्यानंतर संध्याकाळी मुंबई आणि पंजाब या दोन संघांमध्ये सामना रंगला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७७ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना राहुलच्या दमदार खेळीच्या बळावर पंजाब संघाने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बुमराहने भेदक मारा करत ५ धावा देऊन २ बळी घेतले. या धावसंख्येचा पंजाबच्या मोहम्मद शमीने यशस्वी बचाव केला. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना राहुलने डी कॉकला धावचीत केलं. सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्याने एकाच सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

सामन्यात पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यावेळी पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी करत ११ धावा दिल्या. यात पोलार्डच्या एका चौकाराचा समावेश होता. १२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मयंक अग्रवालने संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, एकाच सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघांनी या हंगामात आजच्या आधी १-१ सुपर ओव्हर खेळली होती. दोन्ही संघ त्यात पराभूत झाले होते. पण आज मात्र सुपर ओव्हरच्या लढतीत पंजाबने बाजी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:26 am

Web Title: first time in cricket history ipl thrilling 3 super overs in single day mumbai indians kxip srh kkr vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO: पोलार्डचा धुमधडाका! ठोकले ४ उत्तुंग षटकार
2 VIDEO: पोलार्डने लगावलेला हा उत्तुंग षटकार पाहिलात का?
3 IPL 2020 : तब्बल १० वर्ष…संयमी अर्धशतकासह डी-कॉकची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
Just Now!
X