भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. सचिनचा मुलगा अर्जुनलाही अनेकदा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना नेट्समध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलं आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची स्पर्धा ही युएईत भरवली जाणार आहे. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगले. त्याआधी अर्जुन तेंडुलकरचा युएईत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत पुलमध्ये आराम करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स संघात स्थान देण्यात आलेलं आहे की काय असा प्रश्न पडला. परंतू प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. अर्जुन हा मुंबईच्या संघासोबत नेट बॉलर म्हणून युएईत गेला आहे. आयपीएलदरम्यान प्रत्येक संघ आपल्यासोबत काही गोलंदाज फक्त नेट बॉलर सोबत ठेवतं. हे गोलंदाज संघातील फलंदाजांना फक्त नेटमध्ये गोलंदाजी करतात.

दरम्यान २०१९ च्या हंगामाचं विजेतेपद मिळवलेल्या मुंबईसमोर यंदा पुन्हा एकदा चेन्नईचं आव्हान असणार आहे. या दोन्ही संघांचे आयपीएलमधले सामने हे नेहमी रंगतात. त्यामुळे यंदा या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढाईत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

v