IPL 2020 स्पर्धा युएईमध्ये सुरू आहे. भारतात असलेला करोनाचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा देशाबाहेर भरवण्यात आली आहे. त्यामुळे महिलांचे छोटेखानी IPL देखील यंदा युएईमध्येच खेळवण्यात येणार आहे. Women’s T20 Challenge असं या स्पर्धेचं हे नाव असून याच्या तारखा रविवारी जाहीर करण्यात आल्या. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटू काही दिवसांपूर्वी दुबईला रवाना झाल्या होत्या. त्यानंतर BCCIने ठरवून दिलेला सक्तीचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर या महिला क्रिकेटपटूंनी भन्नाट डान्स केला. मुंबईकर जेमायमा रॉड्रीग्जने हा आनंद शूट केला मराठमोळ्या स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

पाहा व्हिडीओ…

 

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Loksatta anvyarth Two parties join India from Jammu and Kashmir to fight against BJP Farooq Abdullah National Conference Mehbooba Mufti PDP
अन्वयार्थ: भाजपेतर ‘इंडिया’तील घटकपक्षांच्या टवाळक्या
View this post on Instagram

 

End of quarantine! #Repost @jemimahrodrigues @deol.harleen304 @radhay21 @arundhati.reddy @shafalisverma17

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana) on

Women’s T20 Challenge स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी या तीन संघांमध्ये ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत हे सामने शारजाच्या मैदानावर रंगणार आहेत. IPLच्या इतर सामन्यांप्रमाणेच हे सर्व सामनेही सायंकाळी ७.३० वाजल्यापासून खेळले जाणार आहेत. मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या तीन क्रिकेटपटू संघांच्या कर्णधार असणार आहेत.

४ नोव्हेंबर – सुपरनोव्हाज vs व्हेलॉसिटी

५ नोव्हेंबर – व्हेलॉसिटी vs ट्रेलब्लेझर्स

७ नोव्हेंबर – ट्रेलब्लेझर्स vs सुपरनोव्हाज

९ नोव्हेंबर – अंतिम सामना

गेल्या वर्षी या स्पर्धेचं विजेतेपद सुपरनोव्हाजने जिंकलं होतं. याचसोबत IPLच्या प्ले-ऑफ्सच्या सामन्यांचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले.