आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी सज्ज झालेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यासह पुढचे काही सामने इशांत शर्मा खेळू शकणार नाही अशी चिन्ह दिसतं आहेत. Cricbuzz ने यासंदर्भातलं वृत्त दिलंय.

अवश्य वाचा – Ipl 2020 : फिरकीपटूंची जुगलबंदी!

आज दिल्ली कॅपिटल्ससमोर किंग्ज इलेव्हन पंजाबचं आव्हान असणार आहे. सरावादरम्यान इशांत शर्माच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे तो सलामीच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचं कळतंय. दुबईत हा सामना खेळवला जाईल. लॉकडाउन जाहीर व्हायच्या आधीही इशांत शर्माला अनेक काळ दुखापतींनी सतावलं होतं. परंतू यावर मात करुन त्याने पुनरागमन केलं होतं. परंतू पहिल्याच सामन्याआधी झालेल्या या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्ससमोरचं टेन्शन वाढलेलं आहे.

इशांत व्यतिरीक्त दिल्लीच्या संघात कगिसो रबाडा हा प्रमुख गोलंदाज आहे. याचसोबत इशांत पहिल्या सामन्यात खेळणार नसल्यास दिल्लीचं संघ व्यवस्थापन स्टॉयनिस आणि किमो पॉल यांनाही संधी देऊ शकतं. त्यामुळे पहिल्या सामन्यात इशांतची अनुपस्थिती संघाला किती भोवते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – BLOG : आयपीएलचं ‘गोंधळआख्यान’ !