News Flash

IPL 2020 : तुजविण सख्या रे ! साक्षीला येतेय धोनीची आठवण

आयपीएलसाठी धोनी युएईत, साक्षी-झिवा भारतात

फोटो सौजन्य - पीटीआय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने वर्षभराच्या कालावधीने क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलंय. आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी सर्व चाहते आतूर आहेत. बाकीचे क्रिकेटपटू आपल्यासोबत बायको, गर्लफ्रेंडला घेऊन युएईत दाखल झाले आहेत पण धोनीने आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाला भारतामध्येच ठेवलं आहे. एरवी धोनीच्या प्रत्येक सामन्यात मैदानात हजर असणारी साक्षी यंदा आयपीएलचं वातावरण अनुभवू शकत नाहीये. भारतात आपला परिवार आणि मुलगी झिवाची काळजी घेत असताना साक्षीला धोनीची आठवण येते आहे.

धोनी सध्या भारतात नाहीये त्यावेळेत मी इतर गोष्टींमध्ये माझं मन रमवते आहे. या काळात मला अशा अनेक गोष्टी माहिती पडल्या की मी ज्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ होते. झिवाची काळजी घेताना, तिच्याकडे लक्ष देताना मलाही एक वेगळी शिकवण मिळते आहे. तिचे ऑनलाईन क्लास सुरु असतात त्यावेळी माझाही तिच्यासोबत अभ्यास होऊन जातो. लॉकडाउनच्या काळात मुलांना अभ्यास करायला लावण्यासाठी अनेक कल्पना शोधाव्या लागल्या. मी देखील असे अनेक प्रकार करुन पाहिले. आयपीएलचं वातावरण मी घरी बसल्या अनुभवते आहे, प्रत्येक सामना आम्ही टिव्हीवर पाहत आहोत. पण मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येतेय. सध्याच्या परिस्थितीत युएईत Bio Secure Bubble मध्ये राहणं मला आणि झिवाला शक्य झालं नसतं.” Insidesport शी बोलताना साक्षीने माहिती दिली.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईच्या संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबईवर मात केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला नंतरच्या सामन्यात दिल्ली आणि राजस्थानकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आठवडाभराच्या कावावधीने चेन्नईचा सामना आज सनराईजर्स हैदराबादशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात धोनी आणि चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 3:02 pm

Web Title: i miss my husband ms dhoni not attending ipl games in stadiums says sakshi dhoni psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 रैना, हरभजनसाठी संघाची दार कायमची बंद? CSK मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
2 IPL 2020 : पोलार्ड-पांड्या समोर असताना अखेरचं षटक ऑफ-स्पिनरला?? सचिनने मारला कपाळावर हात
3 IPL 2020: पंजाबवरील विजयावर रोहितची प्रतिक्रिया, म्हणाला…
Just Now!
X