विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोरची आव्हानं काहीकेल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात विराट कोहलीच्या संघाने जिंकला. मात्र पंजाबविरुद्ध सामन्यात बंगळुरुची गाडी रुळावरुन घसरली आणि संघ पराभूत झाला. जलदगती गोलंदाजांचं अपयश हा सध्या बंगळुरुच्या संघासमोर मोठा प्रश्न आहे. त्यातच ख्रिस मॉरिसही अद्याप दुखापतीमधून सावरलेला नसून तो मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे.

अवश्य वाचा – IPL2020 : बेंगळूरुला वेगवान माऱ्याची चिंता

“पंजाबविरुद्ध सामन्यात पराभव झाल्यानंतर आम्ही आमच्या चुका सुधारण्याकडे भर दिला. संघात वातावरण उत्साहवर्धक आहे. आम्ही आमच्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही हे खरं आहे. मॉरिस दुखापतीमधून सावरतो आहे परंतू तो मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे. मॉरिस संघात परत येईल याची आम्हीही वाट पाहत आहोत. तो संघात आल्यानंतर बंगळुरुचा संघ अधिक समतोल होईल.” RCB चे Director of Cricket Operation माईक हेसन यांनी माहिती दिली.

उमेश यादव, डेल स्टेन हे संघाचे महत्वाचे गोलंदाज मानले जातात. परंतू त्याची कामगिरी ही लौकिकाला साजेशी होत नाहीये. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.