07 March 2021

News Flash

मनदीपचा तो फोटो पाहून सुनिल शेट्टीही झाला भावूक; म्हणाला…

एका पोस्टमधून सुनिल शेट्टीने आपल्या भावना व्यक्त केल्या

प्रातिनिधिक फोटो

कोलकाता विरूद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघाने ८ गडी राखून दमदार विजय मिळवला. या विजयामुळे पंजाबचे स्पर्धेतील आव्हान कायम राहण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. पंजाबला हा विजय मिळवून देण्यात मनदीप सिंग आणि ख्रिस गेल यांची भागीदारी महत्वाची ठरली. सलामीला आलेल्या मनदीपने नाबाद ६६ धावा केल्या तर गेलने तुफानी खेळी करत ५१ धावांचा पाऊस पाडला. हा पंजाबचा स्पर्धेतील पाचवा विजय ठरला. या विजयाच्या जोरावर पंजाबने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. या विजयानंतर सर्वच स्तरातून मनदीपवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर वर आकाशाकडे पाहत आपल्या वडिलांना अभिवादन करतानाचा मनदीपचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. अभिनेता सुनील शेट्टीही मनदीपची ही खेळी पाहून एक भावनिक पोस्ट केली आहे.

शुक्रवारी रात्री मनदीपच्या वडिलांचं निधन झालं. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला निघण्याआधीच मनदीपच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. याच आजारपणामुळे त्यांचे २३ ऑक्टोबर रोजी निधन झालं. तरी मनदीप दुसऱ्याच दिवशी सर्व धैर्य दाखवून हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदनात उतरला. मनदीप या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. १४ चेंडूत १७ धावा करत मनदीप बाद झाला. मात्र या सामन्यानंतर सोमवारी कोलकाताविरुद्ध खेळताना मनदीपने सर्व कसर भरुन काढली. शनिवारचा विजय पंजाबच्या संघाने मनदीपच्या वडिलांना समर्पित केला. तर सोमवारी मनदीपने अर्धशतक झाल्यानंतर आभाळाकडे पाहात ते वडिलांना समर्पित केलं.

मनदीपची हीच खेळी पाहून अभिनेता सुनिल शेट्टीने एक ट्विट केलं आहे. सुनिलने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्धशतक झलकावल्यानंतर मनदीप आकाशाकडे पाहाताना दिसत आहे. “जेव्हा वडील तुम्हाला आशिर्वाद देत असतात. मनदीप सिंग तुला सलाम,” अशी कॅप्शन सुनील शेट्टीने या फोटोला दिली आहे.

पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. सध्या गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानासाठी तीन संघांमध्ये चुसर पहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 7:36 am

Web Title: ipl 2020 actor suniel shetty emotional tweet for mandeep singh scsg 91
Next Stories
1 IPL 2020 : दिल्लीचा बाद फेरीचा निर्धार
2 IPL 2020: पंजाबचा कोलकाताला विजयी ‘पंच’; मनदीप, गेलची दमदार अर्धशतकं
3 Video: सुपर स्विंग! एकाच ओव्हरमध्ये शमीचे दोन बळी
Just Now!
X