26 October 2020

News Flash

IPL 2020 : तब्बल १० वर्ष…संयमी अर्धशतकासह डी-कॉकची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

पंजाबविरुद्ध मुंबईची १७६ धावांपर्यंत मजल

फोटो सौजन्य - IPL

क्विंटन डी-कॉकचं संयमी अर्धशतक आणि अखेरच्या फळीत कायरन पोलार्ड व नॅथन कुल्टर-नाईल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने पंजाबविरुद्धच्या सामन्यात १७६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय चुकला. रोहित, सूर्यकुमार आणि इशान किशन हे आघाडीच्या फळीतले ३ फलंदाज झटपट माघारी परतले. परंतू क्विंटन डी-कॉकने एक बाजू लावून धरत कृणाल पांड्याच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत डी-कॉकने ४३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.

आयपीएलच्या गेल्या ५ सामन्यांपासून डी-कॉकला चांगलाच फॉर्म गवसला आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात अर्धशतकी खेळी करुन डी-कॉकने तब्बल १० वर्ष सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे. २०१० च्या हंगामात सचिनने मुंबईकडून खेळताना सलग ३ सामन्यांत अर्धशतक झळकावलं होतं. यानंतर २०२० च्या हंगामात डी-कॉकने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

२०१९ पासून आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही डी-कॉक आता चौथ्या स्थानी पोहचला आहे.

दरम्यान, १७ व्या षटकांत मुंबईची अवस्था ६ बाद ११९ अशी झाली होती. यानंतर मैदानात आलेल्या कायरन पोलार्डने आपली जबाबदारी ओळखत पंजाबच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. कुल्टर-नाईलच्या मदतीने पोलार्डने मुंबईला १७६ धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंहने प्रत्येकी २-२ तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 9:36 pm

Web Title: ipl 2020 after 10 years de cock equalize with sachin tendulkar record psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO SRH vs KKR: असा रंगला Super Overचा थरार
2 IPL 2020 : सुपरओव्हरवर अपयशाची मालिका KKR कडून खंडीत
3 IPL 2020: फर्ग्युसनच्या माऱ्यापुढे हैदराबाद ‘लॉक’; कोलकाताचा ‘सुपर’ विजय
Just Now!
X