News Flash

IPL 2020 : चेन्नईच्या विजयाचा मुंबई इंडियन्सला फायदा, प्ले-ऑफचं तिकीट केलंं पक्क

१६ गुणांसह मुंबई प्ले-ऑफमध्ये दाखल

IPL 2020 स्पर्धेचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे. 'प्ले-ऑफ्स'च्या पहिल्या सामन्यात दिल्लीला नमवून मुंबईने सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात ४९ सामन्यांनंतर अखेरीस पहिल्या संघाने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. दुबईच्या मैदानावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मात केली. चेन्नईने मिळवलेल्या या विजयामुळे मुंबई इंडियन्सचं काम सोपं होऊन ते १६ गुणांनिशी प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय ठरले आहेत. RCB विरुद्ध सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवल्यानंतर मुंबईच्या खात्यात ६ गुण जमा झाले होते. परंतू जर-तर ची शक्यता आणि इतर समीकरणांमुळे त्यांचं प्ले-ऑफचं स्थान पक्क झालं नव्हतं.

चौथ्या स्थानासाठी कोलकाता, हैदराबाद, पंजाब आणि राजस्थान या संघांमध्ये शर्यत असताना चेन्नईने कोलकात्यावर मात करणं मुंबईसाठी फायदेशीर ठरणार होतं आणि नेमकं झालंही असतं. ऋतुराज गायकवाड आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली आणि मुंबईला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं. सध्याच्या घडीला मुंबईचा संघ १६ गुण आणि + १. १८६ अशा स्ट्राँग रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर विराजमान आहे. या हंगामात मुंबईचे साखळी फेरीतले दोन सामने शिल्लक असून त्यांना यापुढील सामन्यात दिल्ली आणि हैदराबादचा सामना करायचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 11:28 pm

Web Title: ipl 2020 after csk beat kkr mumbai indians becomes first team to qualify play offs psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : पुण्याचा ऋतुराज गायकवाड चमकला, चेन्नईकडून देतोय एकाकी झुंज
2 IPL 2020 : राणाजी चमकले ! अर्धशतकी खेळी करुन सावरला संघाचा डाव
3 IPL 2020 : रंगतदार सामन्यात CSK ची KKR वर मात, ऋतुराज गायकवाड-जाडेजा चमकले
Just Now!
X