News Flash

Video : पाँटींगच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यचा फलंदाजीचा सराव

१९ सप्टेंबरपासून IPL च्या तेराव्या हंगामाला सुरुवात

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. इतर संघही सध्या युएईत कसून सराव करत आहे. मुंबईकर खेळाडू आणि आयपीएलमध्ये गेले काही हंगाम राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व करत असणारा अजिंक्य रहाणे यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.

प्रशिक्षक रिकी पाँटींग यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यने आज नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. यावेळी रिकी पाँटींगने अजिंक्यच्या फटक्यांचं निरीक्षण करुन त्याला काही टिप्स दिल्या. अजिंक्यने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाप्रमाणेच दिल्लीलाही एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यंदा श्रेयस अय्यरच्या संघात अजिंक्यसोबत रविचंद्रन आश्विनही सहभागी झालाय. त्यामुळे दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 9:27 pm

Web Title: ipl 2020 ajinkya rahane getting batting tips from coach ricky pointing psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : सलामीला आल्यास रोहित शर्मा हंगामात ५०० धावा काढू शकतो !
2 IPL 2020: ‘मुंबई इंडियन्स’च्या धडाकेबाज खेळाडूचा नवा लूक पाहिलात का?
3 Video : सलामीला कोणात्या जोडीला द्यायची संधी?? गतविजेत्यांसमोर यक्षप्रश्न
Just Now!
X