News Flash

IPL 2020 : दुखापतीमुळे अमित मिश्राची स्पर्धेतून माघार, सहकाऱ्यांनी दिला भावपूर्ण निरोप

बोटाला झालेल्या दुखापतीमुळे मिश्राची माघार

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदाच्या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी करतो आहे. काही दिवसांपूर्वी संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. आपल्या संघातील अनुभवी खेळाडूला दिल्लीच्या खेळाडूंनी अलविदा करत, त्याचे आभार मानले आहेत. युएईवरुन अमित मिश्रा आता भारतात परतणार आहे. KKR विरुद्ध सामन्यात अमित मिश्राला दुखापत झाली होती.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने अमित मिश्राला निरोप देण्याआधी त्याचे आभार मानले. हा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आयपीएलच्या इतिहासात १६० बळी घेणारा अमित मिश्रा हा दिल्लीचा सर्वात अनुभवी गोलंदाज मानला जातो. आपल्याला झालेली दुखापत लवकर बरी होईल अशी मिश्राला आशा होती. परंतू स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्यामुळे मिश्राने हतबल असल्याची भावना बोलून दाखवली. तेराव्या हंगामात दिल्लीचा पुढचा सामना शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध शारजाच्या मैदानात रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 4:41 pm

Web Title: ipl 2020 amit mishra bids adieu to delhi capitals with an emotional speech psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 “हा तर माझ्यासाठी सोशल मीडियावरील नवा सुपरस्टार”; गांगुलीच्या पसंतीला चाहत्यांचाही पाठिंबा
2 Video : धोनीची दांडी गुल करणारा वरुण चक्रवर्ती म्हणतो…
3 IPL 2020 : …म्हणून केदार जाधवला जाडेजा-ब्राव्होआधी फलंदाजीसाठी पाठवलं – स्टिफन फ्लेमिंग
Just Now!
X