08 March 2021

News Flash

दिल्लीच्या नॉर्जचा विक्रम, फेकला IPL च्या इतिहासातला सर्वात वेगवान चेंडू

जाणून घ्या किती होता नॉर्जच्या चेंडूचा स्पीड

फोटो सौजन्य - IPL

गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात केली आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला राजस्थानचा संघ १४८ धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून आश्वासक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना ठराविक अंतराने धक्के देणं सुरु ठेवलं. राजस्थानकडून बेन स्टोक्सने एकाकी झुंज दिली, परंतू दिल्लीच्या गोलंदाजांसमोर त्याचीही डाळ शिजू शकली नाही. राहुल तेवतियाने अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून रंगत निर्माण केली. परंतू तुषार देशपांडेने भेदक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.

राजस्थानकडून तुषार देशपांडे आणि नॉर्ज यांनी प्रत्येकी २ बळी घेतला. नॉर्जला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या सामन्यात नॉर्जने प्रभावी मारा करत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. नॉर्जने आयपीएलच्या इतिहासातला सर्वात वेगवान चेंडू राजस्थान रॉयल्सविरुद्ध टाकला. नॉर्जने या सामन्यात १५६.२ किमीच्या वेगाने चेंडू टाकला.

आतापर्यंत नॉर्जने आयपीएलच्या तेराव्या हंगामात १५४ किमी पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकण्याची ही चौथी वेळ ठरली आहे.

दरम्यान, विजयासाठी मिळालेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक आणि सावध सुरुवात केली. परंतू ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे संघाला १३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:33 am

Web Title: ipl 2020 anrich nortje bowled fastes ball in ipl history psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : बेंगळूरुविरुद्धच्या लढतीसाठी गेल सज्ज
2 IPL 2020 : दिल्लीच्या विजयामागचं कल्याण-डोंबिवली कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का??
3 Video : सीमारेषेवर रहाणेचा ‘अजिंक्य’ प्रयत्न, संघासाठी वाचवल्या महत्वाच्या धावा
Just Now!
X