आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना अबु धाबीच्या मैदानावर रंगेल. दुबई, अबुधाबी आणि शारजा अशा ३ मैदानांवर आयपीएलचे सामने खेळवले जातील. काही दिवसांपूर्वी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलची तयारी पाहण्यासाठी युएईत दाखल झाला आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआयचे अधिकारी व UAE क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत शारजा येथील मैदानाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

सौरव गांगुलीसोबत आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, COO हेमांग अमीन हे देखील हजर होते. आपल्या पाहणी दौऱ्याचा एक फोटो गांगुलीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय.

View this post on Instagram

Famous Sharjah stadium all set to host IPL 2020

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly) on

शारजाच्या मैदानावर सौरवने अनेक इनिंग खेळल्या आहेत. या मैदानावर सौरवच्या नावावर ७०० धावा जमा आहेत, ज्यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, गांगुली दुबई आणि अबु धाबी येथील मैदानांनाही भेट देणार आहे.