04 December 2020

News Flash

IPL 2020 : अय्यरच्या समावेशाची दिल्लीला चिंता

विजयी पथावर परतलेल्या महेद्रसिंह धोनीच्या अनुभवी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध दिल्लीचा कस लागणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत दमदार कामगिरी करत अग्रस्थान मिळवले आहे. परंतु शनिवारी होणाऱ्या लढतीत त्यांना कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय खेळावे लागू शकते. त्यामुळे विजयी पथावर परतलेल्या महेद्रसिंह धोनीच्या अनुभवी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध दिल्लीचा कस लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध बुधवारी झालेल्या लढतीत क्षेत्ररक्षण करताना डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे अय्यरला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत शिखर धवनने संघाचे नेतृत्व करताना दिल्लीला १३ धावांनी विजय मिळवून दिला होता.

दुसरीकडे चेन्नईने गेल्या लढतीत सनरायजर्स हैदराबादला २० धावांनी नमवून स्पर्धेतील चुरस कायम राखली. सॅम करणला सलामीला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे चेन्नईची चिंता कमी झाली. शेन वॉटसन आणि फॅफ डय़ू प्लेसिस यांच्यावर चेन्नईची फलंदाजीत मदार आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:04 am

Web Title: ipl 2020 chennai challenge ahead of delhi abn 97
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : डी-कॉक ठरतोय मुंबईचा हुकुमाचा एक्का, अबु धाबीत KKR च्या गोलंदाजांची धुलाई
2 IPL 2020 : तुझी-माझी जोडी जमली रे ! हिटमॅन-डी कॉकच्या भागीदारीमुळे KKR बेजार
3 Video: पहावं ते नवलंच… झेलबाद होण्याचा असा विचित्र प्रकार पाहिलाय?
Just Now!
X