अबू धाबी : चेन्नई सुपर किं ग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गुणतालिके तील स्थिती तशी सारखीच आहे. त्यामुळे बाद फे रीचे आव्हान शाबूत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना सोमवारी विजय अत्यावश्यक आहे.

सध्या तरी चेन्नई आणि राजस्थान या संघांना अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे गुणतालिके त ते अनुक्र मे सहाव्या आणि सातव्या क्र मांकांवर आहेत. त्यामुळे बाद फेरीची वाट दोन्ही संघांसाठी बिकट होत चालली आहे.

अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे काही दिवस खेळू शकणार नसल्यामुळे चेन्नईच्या चिंतेत भर पडली आहे. धोनीच्या नेतृत्वक्षमतेच्या बळावर सनरायजर्स हैदराबादला नमवल्यानंतर चेन्नईची गाडी रुळावर येईल अशी अपेक्षा होती. परंतु ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका दिल्लीविरुद्ध त्यांना बसला.

राजस्थानलाही रंगतदार सामन्यांत दडपण हाताळणे कठीण जाते आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथला गवसलेला सूर ही त्यांच्यासाठी सकारात्मक बाब आहे.

सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, १ सिलेक्ट