22 October 2020

News Flash

IPL 2020: …म्हणून गेलने दाखवला बॅटवरचा ‘THE BOSS’चा स्टीकर

गेलने पहिल्याच सामन्यात केलं झंजावाती अर्धशतक

ख्रिस गेल (फोटो- IPL.com)

IPL 2020मध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने आलेल्या KXIP आणि RCB संघाच्या झुंजीत पुन्हा एकदा पंजाबने बाजी मारली. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने बंगळुरूवर ८ गडी राखून मात केली आहे. तेराव्या हंगामात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने गोलंदाजांची धुलाई करत दमदार अर्धशतक झळकावलं. कर्णधार लोकेश राहुलनेही नाबाद अर्धशतकी (६१) खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

१७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल हे सामना अतिशय संयमी पद्धतीने पुढे नेत होते. पण जेव्हा मयंक अग्रवाल बाद झाला तेव्हा युनिव्हर्स बॉस गेलचं IPL 2020च्या हंगामात पहिल्यांदा फलंदाजीसाठी आगमन झालं. गेलने सुरूवातीला अतिशय संथ खेळ करत खेळपट्टीचा अंदाज घेतला. नंतर मात्र त्याने आपल्या ‘सिक्सर किंग’ या उपाधीला स्मरत चौफेर फटकेबाजी केली. त्याने पहिल्याच सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला तडाखा लगावत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर त्याने त्याच्या बॅटवर असलेला THE BOSS हा स्टीकर कॅमेऱ्याच्या माध्यमातून साऱ्यांना दाखवला. त्याच्या या कृत्यामागे नक्की काय कारण होतं? असा प्रश्न त्याला सामन्यानंतर विचारण्यात आला. त्यावेळी त्याने थोडक्यात पण मस्त उत्तर दिलं. “मला फक्त इतकंच दाखवायचं होतं की या नावाची (THE BOSS) जादू अजून संपलेली नाही. त्यामुळे या नावाचा आदर करत राहा.. बास!!”, असं गेल म्हणाला.

सलामीवीर म्हणून ओळख असलेल्या गेलला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला यावं लागलं. त्याबद्दलही गेलने स्पष्टीकरण दिलं. “खेळपट्टी खूप संथ होती. चेंडू टप्पा पडल्यावर सावकाश बॅटवर येत होता. आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजी करणं थोडं सोपं झालं. संघ व्यवस्थापनाने मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं त्यावर मी लगेच होकार दिला. गेले ७-८ सामने आमचे सलामीवीर चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांची लय तोडण्यात काहीच अर्थ नव्हता. मला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं आणि मी माझं काम फत्ते केलं”, असं गेलने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 2:24 pm

Web Title: ipl 2020 chris gayle shows the boss sticker on bat tells reason to sunil gavaskar rcb vs kxip virat kohli kl rahul watch video vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : KKR मध्ये नेतृत्वबदल, मॉर्गन संघाचा नवीन कर्णधार
2 IPL 2020 : …म्हणून डिव्हीलियर्स सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, विराटने सांगितलं कारण
3 “जेव्हा ‘ती’ दरवाजा लावायला सांगते…”; विराटचा मजेदार व्हिडीओ झाला व्हायरल
Just Now!
X