News Flash

IPL 2020 : CSK ने आपल्याच खेळाडूंना केलं ट्रोल, संथ खेळ पाहून चाहत्यांनाही आली झोप

दिल्लीची चेन्नईवर ४४ धावांनी मात

राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर चेन्नईच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यातही पराभव स्विकारावा लागला. १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर शेन वॉटसन आणि मुरली विजय स्वस्तात माघारी परतले. यानंतर ऋतुराज गायकवाडही धावबाद झाला.

अवश्य वाचा – IPL 2020 : गोलंदाजी आणि फलंदाजीत आमची कामगिरी चांगली होत नाहीये – धोनी

यानंतर केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस जोडीने मधल्या षटकांत महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू या भागीदारीदरम्यान अपेक्षित धावगती न राखता आल्यामुळे चेन्नईवरचं दडपड वाढलं. आपल्या फलंदाजांचा संथ खेळ पाहून चेन्नई सुपरकिंग्जच्या ट्विटर हँडलनेही दाक्षिणात्य चित्रपटातील एका झोपलेल्या अभिनेत्याचा फोटो पोस्ट करत खेळाडूंना ट्रोल केलं.

अखेरच्या षटकांत केदार जाधव आणि डु-प्लेसिस माघारी परतल्यानंतर धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले आणि दिल्लीने ४४ धावांनी सामन्यात विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 2:01 pm

Web Title: ipl 2020 csk troll their players for their slow game against dc psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : गोलंदाजी आणि फलंदाजीत आमची कामगिरी चांगली होत नाहीये – धोनी
2 कर्णधार कोहलीला १२ लाखांचा दंड
3 IPL 2020 : कार्तिकच्या रणनीतीकडे लक्ष
Just Now!
X