06 December 2020

News Flash

IPL 2020 : शून्यावर बाद झालेला पृथ्वी ड्रेसिंग रुममध्ये थेट जेवायला बसला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

चहरच्या गोलंदाजीवर पृथ्वी शून्यावर बाद

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ गेल्या काही सामन्यांपासून कठीण काळातून जात आहे. सलग ३ सामन्यांमध्ये पृथ्वी फलंदाजीत अपयशी ठरत असून दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला आहे. शारजाच्या मैदानात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्लीला विजयासाठी १८० धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने आपल्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉला शून्यावर माघारी धाडत दिल्लीला मोठा धक्का दिला.

आयपीएलमध्ये आतापर्यंत पृथ्वी शॉ आणि दीपक चहर यांच्या द्वंद्वात नेहमी चहरने बाजी मारली आहे. हेच सूत्र या सामन्यातही कायम राहिलं. स्विंग होऊन आलेल्या चहरच्या चेंडूवर सरळ फटका खेळण्याच्या प्रयत्नात शॉ त्याच्या हाती झेल देऊन बाद झाला. यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जेवत असताना पृथ्वीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला अधिकच ट्रोल करायला सुरुवात केली.

#DelhiCapitals fan's to Prithvi Shaw after three consecutive ducks :#CSKvsDC pic.twitter.com/AodlcruZmh

— Abhilekh Pandey (@Satirical_saint) October 17, 2020

त्याआधी चेन्नईने फाफ डु-प्लेसिस, अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर १७९ धावांपर्यंत मजल मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 10:50 pm

Web Title: ipl 2020 csk vs dc prithvi shaw once agaon fail social media trolls him psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO: धडामssssssssssss पाहा डु प्लेसिस-रबाडा यांच्यातील भयानक धडक
2 IPL 2020 : कगिसो रबाडाचं अर्धशतक, लसिथ मलिंगा-सुनील नारायणचा विक्रम मोडला
3 IPL 2020 : शिखरच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्सचा विजय, रंगतदार सामन्यात चेन्नई पराभूत
Just Now!
X