ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना खेळताना धडाकेबाज खेळी करत अर्धशतक साजरं केलं आहे. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे संकाटात सापडलेल्या आपल्या संघाला स्टॉयनिसने बाहेर काढलं. ६ बाद ९६ अशी परिस्थिती असताना स्टॉयनिसने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली आणि अखेरच्या षटकांमध्ये पंजाबच्या गोलंदाजीवर चौफेर हल्ला केला.

२१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने स्टॉयनिसने ५३ धावांची खेळी केली. त्याच्या या आक्रमक खेळामुळे एका क्षणाला संकटात सापडलेला दिल्लीचा संघ १५७ धावांपर्यंत मजल मारु शकला. या खेळीदरम्यान स्टॉयनिसने अनोखा विक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात एका डावात अखेरच्या ३ षटकांमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्टॉयनिसला स्थान मिळालं आहे.

स्टॉयनिसने संघाचा डाव सावरला असला तरीही दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली. मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी संघाचा डाव सावरला. परंतू मोक्याच्या क्षणी दोघांनीही आपली विकेट फेकली.