News Flash

मराठमोळ्या तुषार देशपांडेचं IPLमध्ये पदार्पण, दिल्लीच्या संघाकडून खेळणार पहिला सामना

हर्षल पटेलला दिल्लीने दिली विश्रांती, मुंबईकर खेळाडूवर दाखवला विश्वास

स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मराठमोळ्या तुषार देशपांडेला अखेरीस आपला पहिला आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तुषारला दिल्ली कॅपिटल्सने अंतिम ११ जणांच्या संघात स्थान दिलं आहे. हर्षल पटेलच्या जागी तुषार दिल्लीच्या संघाकडून खेळेल. तेराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने तुषार देशपांडेवर २० लाखांची बोली लावली होती.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात दिल्लीचा अंतिम ११ जणांचा संघ पुढीलप्रमाणे –

तुषारने आतापर्यंत रणजी आणि इतर स्पर्धांमधून मुंबईचं प्रतिनिधीत्व केलं आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये चांगला मारा करुन विकेट मिळवण्यात पटाईत असलेल्या तुषारला यंदा पहिल्यांदाच आयपीएल खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तुषार देशपांडेच्या नावावर आतापर्यंत २० सामन्यांत ५० बळी जमा आहेत. याव्यतिरीक्त फलंदाजीतही तुषार अखेरच्या फळीत चांगली फटकेबाजी करतो त्यामुळे आपल्याला मिळालेल्या संधीचं तुषार कसं सोनं करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 7:16 pm

Web Title: ipl 2020 dc vs rr mumbai lad tushar despande making his ipl debut psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : Mid Transfer Window मधून CSK नवीन खेळाडूंना संधी देणार??
2 IPL 2020 : तब्बल ६ वर्षांची तपश्चर्या दुबईच्या मैदानात भंग
3 Video : ‘कॅप्टन कूल’ को जब गुस्सा आता है ! कर्ण शर्मावर मैदानातच भडकला धोनी
Just Now!
X