28 November 2020

News Flash

IPL 2020 : बाद फेरी गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स उत्सुक

आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सामना

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीतील स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधी आहे. जायबंदी आंद्रे रसेलच्या समावेशाबाबत साशंकता असल्याने दडपणाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सशी त्यांची शनिवारी गाठ पडणार आहे.

दिल्लीला गेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने पराभूत केले. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन तुफान फॉर्मात असून गेल्या दोन सामन्यांत त्याने नाबाद शतके झळकावली आहेत. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ देण्याची आवश्यकता असून कर्णधार अय्यरसह ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे.

दुसरीकडे इऑन मॉर्गनच्या कोलकाताला बेंगळूरुविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. शुभमन गिल, नितीश राणा यांचे अपयश कोलकातासाठी चिंतेचा विषय ठरत असून अनुभवी दिनेश कार्तिकलाही छाप पाडता आलेली नाही.

* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:25 am

Web Title: ipl 2020 delhi capitals play against kolkata knight riders today abn 97
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : पंजाब-हैदराबादमध्ये कडवी झुंज
2 IPL 2020: ‘मुंबई इंडियन्स’चा CSKला ‘दुहेरी’ दणका; केला सर्वात लाजिरवाणा पराभव
3 IPL 2020 : …अखेर बोल्टसमोर करनने गुडघे टेकलेच
Just Now!
X