21 January 2021

News Flash

Video: पाचव्या IPL विजेतेपदानंतर रोहित काय म्हणाला? ऐका संपूर्ण भाषण

स्पर्धेत एकही सामना खेळायला न मिळालेल्या खेळाडूंबद्दल रोहितने सांगितले की...

IPL 2020 FINALमध्ये बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

स्पर्धेतील पाचव्या विजेतेपदानंतर रोहितने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सर्व खेळाडू, त्यांचे कुटुंबीय, सहाय्यक कर्मचारी साऱ्यांशी संवाद साधला. मुंबई इंडियन्स म्हणजे संघ नसून एक कुटुंब असल्याचा पुनरूच्चार केला. सर्व खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय यांचे आभार मानले. याशिवाय संपूर्ण स्पर्धेत सोबत असलेल्या पण एकही सामना खेळायला न मिळालेल्या खेळाडूंबाबत रोहितने विशेष मत व्यक्त केलं.

ऐका रोहित नक्की काय म्हणाला…

दरम्यान, अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ५६ तर श्रेयस अय्यरने नाबाद ६५ धावांची खेळी केली. १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने विजयाचा पाया रचला. रोहित धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 6:11 pm

Web Title: ipl 2020 final rohit sharma superb speech in mumbai indians dressing room nita ambani cricketers vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL ने मोडले सर्व विक्रम, प्रेक्षकसंख्येत २८ टक्क्यांनी वाढ
2 IPL 2020: “बोला था ना मामू…”; रोहित शर्माने केलं भन्नाट ट्विट
3 IPL 2020 : माझ्या जागेवर रोहित असता तर त्यानेही असंच केलं असतं – सूर्यकुमार
Just Now!
X