27 November 2020

News Flash

Video : रोहितची रणनिती सफल, ‘डावखुऱ्या’ गब्बरची जयंत यादवकडून दांडी गुल

दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांकडून निराशा

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाती धडाकेबाज सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचा निर्णय चुकला. ट्रेंट बोल्टने मार्कस स्टॉयनिस आणि अजिंक्य रहाणे यांना स्वस्तात माघारी धाडत दिल्लीला दोन मोठे धक्के दिले.

अंतिम सामन्यात मुंबईने संघात बदल करत राहुल चहरऐवजी जयंत यादवला स्थान दिलं. दिल्लीच्या संघातील डावखुऱ्या फलंदाजांची फौज पाहता मुंबईने जयंत यादवच्या अनुभवाला पसंती दर्शवण्याचं ठरवलं. जयंत यादवनेही आपल्यावर दाखवण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवत फॉर्मात असलेल्या शिखर धवनची दांडी गुल केली. पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला माघारी धाडत ट्रेंट बोल्टनेही अंतिम सामन्यात विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या इतिहासात अंतिम फेरीत पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

अवश्य वाचा – IPL 2020 : दिल्लीचा हुकुमी एक्का वाया, स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत बोल्टचा विक्रम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 8:03 pm

Web Title: ipl 2020 final rohit sharma tactical move work jayant yadav clean bowled shikhar dhawan psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : दिल्लीचा हुकुमी एक्का वाया, स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत बोल्टचा विक्रम
2 अंतिम सामन्यात रोहितने खेळला मोठा डाव, चहरला बाहेरचा रस्ता; जयंत यादवला संघात स्थान
3 IPL का किंग कौन?….. मुंबई इंडियन्स! पाचव्यांदा जिंकलं विजेतेपद
Just Now!
X