News Flash

IPL 2020 : RCB विरुद्ध सामन्यात संघात मोठ्या बदलांची गरज नाही – जसप्रीत बुमराह

प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी मुंबईला विजय आवश्यक

आयपीएलच्या तेराव्या हंगामात बुधवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे. विजय मिळवून प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करण्याची संधी दोन्ही संघांसमोर आहे. राजस्थानिवरुद्ध सामन्यात मुंबईला विजयाची चांगली संधी होती. परंतू बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी शतकी भागीदारी करत मुंबईच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. त्यातचं कर्णधार रोहित शर्माचं दुखापतीमुळे संघाबाहेर असणं मुंबईला चांगलंच महागात पडतंय. अशा परिस्थितीतही मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह RCB विरुद्ध सामन्यात संघामध्ये मोठे बदल करण्याची आवश्यकता नसल्याचं म्हणतोय.

अवश्य वाचा – IPL 2020 : प्ले-ऑफची शर्यत होतेय रंगतदार, तुमचा आवडता संघ आहे का या शर्यतीत? जाणून घ्या…

“आतापर्यंत लागलेल्या निकालावर आम्ही खुश आहोत. एक गोष्ट आमच्या सर्वांच्या मनात पक्की आहे ती म्हणजे संघात मोठे बदल करण्याची आता गरज नाहीये. राजस्थानविरुद्ध सामना हा आमच्यासाठी एक असा दिवस होता की जिकडे प्रतिस्पर्धी संघ तुमच्यापेक्षा चांगलं खेळून जातो. त्यामुळे चांगला खेळ करुन पुढे जात राहणं हेच आमच्या हातात आहे.” बुमराहने संघाची बाजू स्पष्ट केली. यंदा मुंबईचे खूप चांगल्या गोलंदाजांची फौज आहे. आम्ही RCB विरुद्ध सामन्यात काय रणनिती असावी याबद्दल चर्चा केली असल्याचंही बुमराह म्हणाला.

दरम्यान आतापर्यंत आयपीएलचा तेरावा हंगाम हा अपेक्षेपेक्षा जास्त रंगतदार झाला आहे. काही दिवसांपूर्वी गुणतालिकेत तळाशी असलेल्या पंजाबने सलग सामने जिंकून प्ले-ऑफमध्ये आपली दावेदारी सांगणं. यानंतर अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली, मुंबई, बंगळुरु यांच्या पदरात आलेला पराभव त्यामुळे अजुनही प्ले-ऑफमध्ये एकही संघ आपलं स्थान निश्चीत करु शकलेला नाही. बुधवारी मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यात जिंकणारा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 3:29 pm

Web Title: ipl 2020 jasprit bumrah feels theres no need for drastic changes against rcb psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: विराटच्या RCBविरूद्ध सामना खेळण्याआधी मुंबईचा ‘हिटमॅन’ काय करतोय? पाहा फोटो
2 IPL 2020 : प्ले-ऑफची शर्यत होतेय रंगतदार, तुमचा आवडता संघ आहे का या शर्यतीत? जाणून घ्या…
3 IPL 2020 : रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईची बेंगळूरुशी झुंज
Just Now!
X