24 October 2020

News Flash

“जेव्हा ‘ती’ दरवाजा लावायला सांगते…”; विराटचा मजेदार व्हिडीओ झाला व्हायरल

विराटच्या व्हिडीओवर आर्चरची भन्नाट कमेंट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या एनर्जीसाठी आणि मैदानातील चपळ हलचालींसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या तेराव्या हंगामात गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्याआधीही विराट अशाच प्रकारे सरावादरम्यान मस्ती करताना दिसला. सामन्याआधीच्या सरावामध्ये विराट अगदी उत्साहामध्ये हसत हसत व्यायाम करताना दिसला.

शारजाच्या मैदानातील या सामन्याच्या सुरुवातीच्या आधी दाखवण्यात आलेल्या एका क्लिपमध्ये कोहली अगदी निवांतपणे मस्करीच्या मूडमध्ये सराव करत असल्याचे दिसले. कोहलीची सरावाची स्टाइल पाहून समालोकांनाही हासू आवरले नाही. कोहलीचा हा सराव सध्या सोशल नेटवर्किंगवर मिम्सचा विषय ठरत आहे. बसल्या बसल्या व्यायाम करताना कोहली अचानक गोल गोल लोळत एका जागेवरुन दुसरीकडे जातो, हवेत लाथा मारत हसताना या क्लिपमध्ये दिसत आहे. त्यामुळेच या क्लिपच्या माध्यमातून नेटकऱ्यांना ट्रोलिंगासाठी आयते खाद्य मिळाले आहे. मात्र विराटला ट्रोल करणाऱ्यांमध्ये एक खास नावही आहे आणि ते आहे जोफ्रा आर्चर.

इंग्लंडचा खेळाडू असणारा आर्चर यंदा राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असणाऱ्या आर्चरनेही विराटचा हा व्हिडीओ ट्विटरवरुन कोट करुन रिट्विट केला आहे. मात्र हा रिट्विट करताना त्याने लिहिलेली कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.”जेव्हा ती तुम्हाला दरवाजा लावायला सांगते”, अशी मजेदार कॅप्शन आर्चरने या व्हिडीओला दिली आहे.

आर्चरबरोबरच इतरही अनेक अकाऊंटवरुन या व्हिडीओवर गाण्यांचे डबिंग करुन विराटला ट्रोल करण्यात आलं आहे. एकाने तर या व्हिडीओला ‘लगावे तू लिपस्टिक हिलेला सारा डिस्ट्रिक्ट’ या भोजपूरी गाण्याचा आवाज देत तो ट्विट केला आहे.

यंदाचा आयपीएलचा सिझन हा आरसीबीसाठी आतापर्यंतच्या सर्व सिझनपैकी सर्वोत्तम ठरला आहे. त्यामुळेच विराट एवढा आनंदात असल्याची शक्यता समालोचकांनी व्यक्त केलीय. आरबीसी सध्या गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये सातत्याने येणाऱ्या अपयशाची भरपाई यंदा आरसीबी करणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 10:40 am

Web Title: ipl 2020 jofra archer reacts hilariously to virat kohli pre match viral dance video scsg 91
Next Stories
1 IPL 2020 : मुंबई इंडियन्सचे पारडे जड
2 कोहली-डीव्हिलियर्सवर बंदी घालावी -राहुल
3 …तर गेलचा फटका शारजावरुन अबु धाबीला जाईल ! गेलच्या वादळी खेळीवर युवराजची फटकेबाजी
Just Now!
X