30 November 2020

News Flash

Video : सीमारेषेवर जोफ्रा आर्चरचा भन्नाट झेल, सचिन म्हणतो…घरातला बल्ब बदलतोय

मुंबईची १९५ धावांपर्यंत मजल

फोटो सौजन्य - IPL

सलामीवीर इशान किशन आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात १९५ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पोलार्डने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी-कॉक ६ धावा काढून माघारी परतला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अखेरीस कार्तिक त्यागीने इशान किशनला माघारी धाडत मुंबईची जोडी फोडली.

सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या जोफ्रा आर्चरने उडी मारत इशान किशनचा भन्नाट झेल घेतला. पाहा हा व्हिडीओ…

जोफ्रा आर्चरचा हा भन्नाट झेल पाहून सचिन तेंडुलकरने, आर्चर आपल्या घरातला बल्ब बदलतोय असं वाटतंय अशी कमेंट केली.

Next Stories
1 Video: बाबोsss….. सूर्यकुमारचा ‘अजब-गजब’ षटकार एकदा पाहाच
2 IPL 2020 MI vs RR: बेन स्टोक्सचं धडाकेबाज शतक; राजस्थानचा मुंबईवर विजय
3 IPL 2020: पुण्याच्या ऋतुराजचा दुबईत धमाका; चेन्नईची बंगळुरूवर मात
Just Now!
X