24 February 2021

News Flash

IPL 2020 : “गेल भैय्या आहेत King Of…”; पंजाबच्या संघाकडून मिर्झापूर स्टाइल कौतुक

KXIP चं भन्नाट ट्विट होतंय व्हायरल

(फोटो सौजन्य: किंग्स इलेव्हन पंजाबच्या ट्विटरवरुन साभार)

४१ वर्षीय ख्रिस गेलने कोलकत्याविरुद्धच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वय हा केवळ आकडा असतो हे सिद्ध करुन दाखवलं. हातामध्ये दम असेल तर वय हे कारण असू शकत नाही हेच गेलने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलं. टी-२० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज अशी ओळख असणाऱ्या गेलने सोमवारी कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात अवघ्या २९ चेंडूंमध्ये ५१ धावांची खेळी करत संघाला सलग पाचवा विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. या विजयामुळे पंजाबच्या बादफेरीत जाण्याच्या आशा कायम आहेत. गेलने दुसऱ्या विकेटसाठी मनदीप सिंगबरोबर १०० धावांची भागीदारी केली. याचमुळे पंजाबला १९ व्या षटकात विजय मिळवता आला.

पंजाबने धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. त्यामुळे पंजाबच्या डावाच्या सुरुवातील जास्त चौकार आणि षटकार पाहायला मिळाले नाहीत. जिंकण्यासाठी १५० धावांचा पाठलाग करताना पंजाबने पहिल्या आठ षटकांमध्ये ४७ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार के. एल. राहुल बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या गेलने नावाला साजेशी फलंदाजी केली. सर्वात आधी गेलने कोलकात्याच्या भरोश्याचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा समाचार घेतला. गेलने वरुणला सलग दोन चेंडूंवर दोन षटकार लगावले. त्यानंतर गेल वादळ सुनील नरेनवर बरसले. अनेकदा नरेनसमोर गेल चाचपताना दिसतो. मात्र सोमवारी चित्र वेगळचं दिसलं. नरेनच्या गोलंदाजीवर ११ चेंडूत गेलने १७ धावा केल्या. यामध्ये एका उत्तुंग षटकाराचाही समावेश होता. गेलने २९ चेंडूमध्ये ५१ धावांची खेळी केली ज्यात पाच षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.

गेलच्या याच खेळीला सलाम करण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक भन्नाट ट्विट करण्यात आलं आहे. सध्या हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर अॅमेझॉन प्राइमवरील मिर्झापूर या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागाची जोरदार चर्चा आहे. याच सिरीजमधील एक संवाद पंजाबने गेलचं कौतुक करताना पोस्ट केला आहे. “शेर की उम्र ज्यादा है लेकिन बुड्ढा नहीं हुआ अभी तक..”, असं ट्विट पंजाबने केलं आहे. या ट्विटबरोबरच पंजाबने एक खास फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये शारजा या शब्दाची फोड करुन शेर जहा असं करण्यात आलं आहे. तसेच मिर्झापूरमधील मुन्ना भैय्या या पात्राच्या गाडीवरील किंग ऑफ मिर्झापूरच्या पाटीप्रमाणे ‘किंग ऑफ शारजा’ असं म्हणत युनिव्हर्सल बॉस असणाऱ्या गेलचं कौतुक केलं आहे.

गेल आला अन्

किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने स्पर्धेतील पहिल्या काही सामन्यांमध्ये गेलला अंतिम ११ खेळाडूंमध्ये जागा दिली नाही. मात्र गेल संघात आल्यानंतर संघाचे नशीब पालटल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. पंजाबने सलग पाच सामने जिंकले आहेत. गेल संघात असला की समोरच्या संघातील गोलंदाजांवर वचक राहतो असं म्हटलं जातं. गेलने पाच सामन्यांमध्ये १७७ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 9:35 am

Web Title: ipl 2020 kings xi punjab tweet about chris gayle with reference to mirzapur 2 scsg 91
Next Stories
1 IPL 2020 : “माझे बाबा मला नेहमी सांगायचे की…”; विजयानंतर मनदीपने सांगितली आठवण
2 मनदीपचा तो फोटो पाहून सुनिल शेट्टीही झाला भावूक; म्हणाला…
3 IPL 2020 : दिल्लीचा बाद फेरीचा निर्धार
Just Now!
X