तेराव्या हंगामात प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करत स्पर्धेतली रंगत आणखी वाढवली आहे. राजस्थान रॉयल्सवर ६० धावांनी मात करत कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत अखेरच्या स्थानावरुन थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. १४ गुणांसह KKR चा संघ सध्या चौथ्या स्थानावर असला तरीही प्ले-ऑफमध्ये त्यांचं स्थान अजुन पक्क झालेलं नाही. मंगळवारी मुंबई विरुद्ध हैदराबाद या सामन्यातील निकालावर KKR चं भवितव्य ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : महत्वाच्या सामन्यात KKR चा ‘हल्लाबोल’, राजस्थानचं आव्हान संपुष्टात

परंतू गेल्या काही दिवसांमध्ये गुणतालिकेत ओएन मॉर्गनच्या संघाचा प्रवास हा वाखणण्याजोगा राहिलेला आहे. २९ ऑक्टोबरनंतर KKR चा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. यानंतर या संघाची घसरण होतहोत १ नोव्हेंबरला चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यानंतर KKR चा संघ थेट अखेरच्या स्थानावर फेकला गेला. मात्र यानंतर राजस्थानवर ६० धावांनी मात करत KKR ने थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

१९२ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाच्या फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला. जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज आश्वासक खेळी करु शकला नाही. KKR कडून पॅट कमिन्सने ४, शिवम मवी आणि वरुण चक्रवर्तीने २-२ तर कमलेश नागरकोटीने १ बळी घेतला.

अवश्य वाचा – Video : दिनेश कार्तिकचा हा कॅच पाहिलात का?? तुम्हीही थक्क व्हाल !