आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफसाठीची शर्यत आता अधिक रंगतदार होत असताना KKR संघासमोरच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत. प्रमुख खेळाडूंचं फॉर्मात नसणं, दुखपतींचं ग्रहण यामुळे हा संघ सध्या संकटात सापडला आहे. बुधवारी RCB विरुद्ध सामन्यात KKR ची फलंदाजी पुन्हा एकदा उघडी पडली. मोहम्मद सिराज, ख्रिस मॉरिस आणि नवदीप सैनी यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सची आघाडीची फळी पुरती कोलमडली.

अवश्य वाचा – 0, 0, W, W, 0, 0, 0, 0, W IPL मध्ये सिराजची विक्रमी कामगिरी

पॉवरप्लेमध्ये KKR चा संघ ४ गड्यांच्या मोबदल्यात फक्त १७ धावांपर्यंत मजल मारु शकला. IPL च्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये KKR ची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. पाहूयात आतापर्यंत KKR ची पॉवरप्लेमधली खराब कामगिरी –

  • ४ बाद १७ – KKR vs RCB – २०२०
  • ३ बाद २१ – KKR vs Deccan Chargers – २००९
  • ४ बाद २२ – KKR vs CSK – २०१०
  • ३ बाद २४ – KKR vs KXIP – २०१४

RCB च्या गोलंदाजांमध्ये उठून दिसला तो मोहम्मद सिराज. सुरुवातीच्या स्पेलमधली दोन षटकं निर्धाव टाकत ३ बळी घेण्याचा विक्रम मोहम्मद सिराजने आपल्या नावावर केला. आयपीएलच्या सामन्यात दोन मेडन ओव्हर टाकणारा सिराज पहिलाच गोलंदाज ठरला आहे. राहुल त्रिपाठी, नितीश राणा आणि टॉम बँटन या फलंदाजांना सिराजने माघारी धाडलं. RCB च्या या भेदक माऱ्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज पुरते भांबावलेले दिसले. नवदीप सैनीनेही शुबमन गिलला माघारी धाडत KKR च्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली.