अबु धाबीच्या मैदानावर सुरु असलेल्या सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी आज पुन्हा एकदा भेदक मारा केला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या जोडीने कोलकात्याला चांगली सुरुवात करुन दिली. टी. नटराजनने राहुल त्रिपाठीचा त्रिफळा उडवत हैदराबादला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कोलकात्याच्या धावगतीवर अंकुश लावण्यात हैदराबादचे गोलंदाज यशस्वी झाले.

राहुल त्रिपाठी बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि नितीश राणा ही जोडी मैदानावर स्थिरावणार असं वाटत असतानाच राशिद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गिल झेलबाद होऊन माघारी परतला. प्रियम गर्गने धावत जाऊन गिलचा सुरेख झेल पकडत हैदराबादला आणखी एक यश मिळवून दिलं. पाहा हा व्हिडीओ…

यानंतर अखेरच्या षटकांमध्येही हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांनी आश्वासक कामगिरीच करत संघासाठी काही महत्वाच्या धावा वाचवल्या. कोलकात्याचा एकही फलंदाज मैदानात दीर्घ काळासाठी टिकून मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरला. ज्यामुळे KKR ला २० षटकांत १६३ धावांपर्यंत मजल मारु शकला.