‘आयपीएल’चा १३वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला असून अद्याप एकाही संघाचे बाद फेरीतील स्थान निश्चित झालेले नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज वगळता उर्वरित सात संघांपैकी नेमका कोणता संघ अव्वल चौघांमध्ये प्रवेश करणार, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

सध्या गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर विराजमान असलेल्या मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु या संघांना वैयक्तिक मागील लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. त्या उलट किंग्ज इलेव्हन पंजाबने अनपेक्षित भरारी घेत सलग पाच सामने जिंकल्याने चौथ्या स्थानाची शर्यत अधिक चुरशीची झाली आहे. पंजाब व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद हे संघ मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत असल्याने गुणतालिकेतील वरच्या क्रमांकावरील संघांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आगामी आठवडा खेळाडूंसह चाहत्यांच्या दृष्टीनेही फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

‘आयपीएल’-२०२० गुणतालिका

१.  मुंबई इंडियन्स   ११ ७  ४  १४ १.२५२

२.  रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु ११ ७  ४  १४ ०.०९२

३.  दिल्ली कॅपिटल्स १२ ७  ५  १४ ०.०३०

४.  किंग्ज इलेव्हन पंजाब १२ ६  ६  १२ -०.०४९

५.  कोलकाता नाइट रायडर्स  १२ ६  ६  १२ -०.४७९

६.  सनरायजर्स हैदराबाद १२ ५  ७  १० ०.३९६

७.  राजस्थान रॉयल्स १२ ५  ७  १० -०.५०५

८.  चेन्नई सुपर किंग्ज  १२ ४  ८  ८  -०.५६०२