इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

वेगवान गोलंदाज लॉकी फग्र्युसन याचा अखेरच्या टप्प्यात समावेश करण्यात आल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सला खऱ्या अर्थाने सूर गवसला आहे. आता बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पहिल्या लढतीतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोलकाता संघ उत्सुक असेल.

ईऑन मॉर्गनकडे नेतृत्व सोपवल्याचा निर्णय कोलकातासाठी फायदेशीर ठरत असून त्यांनी नऊ सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत चौथे स्थान प्राप्त केले आहे.

बेंगळूरुने सहा विजयांसह गुणतालिकेत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. एबी डीव्हिलियर्स तुफान बहरात आहे. गोलंदाजीत फिरकीपटू यजुर्वेद्र चहल छाप पाडत आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १