01 December 2020

News Flash

IPL 2020 : सामन्याआधी वडिलांचं निधन, आभाळाएवढं दुःख विसरुन मनदीप मैदानात

हैदराबादविरुद्ध सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची निराशा

फोटो सौजन्य - IPL

आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफची शर्यत अधिक रंगतदार झालेली असताना हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. निर्धारित षटकांत पंजाबचा संघ १२६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. नाणेफेक जिंकत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने आज दुखापतग्रस्त मयांक अग्रवालच्या जागी मनदीप सिंहला संघात स्थान दिलं. मयांक नसताना ख्रिस गेल लोकेश राहुलसोबत सलामीला येईल अशी सर्वांना आशा होती, परंतू पंजाबने युवा मनदीप सिंहला राहुलसोबत संधी दिली.

युवा मनदीपसाठी आजचा सामना सोपा नव्हता. शुक्रवारी रात्री मनदीपच्या वडिलांचं निधन झालं. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला निघण्याआधीच मनदीपच्या वडिलांची तब्येत खराब होती. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान मनदीप या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. १४ चेंडूत १७ धावा करत मनदीप बाद झाला. मनदीप संदीप शर्माचा आयपीएलच्या इतिहासातला १०० वा बळी ठरला. पंजाबच्या इतर फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. निकोल पूरनने अखेरपर्यंत लढा देऊन संघाला १२६ धावांचा टप्पा गाठून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 9:42 pm

Web Title: ipl 2020 kxip vs srh lost his father last night mandeep singh still came to bat for his team psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: अटीतटीच्या लढतीत पंजाबच ‘किंग’; हैदराबादने १७ धावांत गमावले ७ बळी
2 IPL 2020: वरूणच्या फिरकीपुढे दिल्लीचं लोटांगण; मलिंगा, हरभजनच्या पंगतीत स्थान
3 IPL 2020 : एक बळी आणि संदीप शर्माला थेट भुवनेश्वर, नेहरा, झहीरच्या पंगतीत स्थान
Just Now!
X