News Flash

IPL 2020 : लोकेश राहुलची गाडी सुसाट, केली सचिनलाही न जमलेली कामगिरी

सलग ५ विजयांमुळे पंजाबचं स्पर्धेतलं आव्हान कायम

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यंदा चांगल्याच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी लोकेश राहुलला बढती देत उप-कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. संघात झालेली आपली निवड सार्थ ठरवत लोकेश राहुलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात मैलाचा दगड पार केला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात लोकेश राहुलने ६०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात राहुलने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.

२०१८ साली राहुलने आयपीएलच्या हंगामात ६०० धावांचा टप्पा ओलांडला होता. सचिन तेंडुलकरलाही अशी कामगिरी करणं जमलं नव्हतं. राहुलव्यतिरीक्त विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे.

नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरने आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत पहिल्याच षटकात मनदीप सिंहला माघारी धाडलं. मात्र यानंतर राहुल आणि ख्रिस गेल यांनी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 8:05 pm

Web Title: ipl 2020 lokesh rahul cross 600 runs mark 2nd time in ipl history psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : सलग तीन पराभव झाले म्हणून संघ वाईट ठरत नाही – अजिंक्य रहाणे
2 पुरंदरचं पाणी गाजवतंय IPL ! जाणून घ्या CSK चा मराठमोळा शिलेदार ऋतुराज गायकवाडबद्दल
3 IPL playoffs : जागा ३ संघ ६ बहुत काम्पिटिसन है…
Just Now!
X