24 October 2020

News Flash

IPL 2020 : राजस्थानच्या वादळात CSK चा पालापाचोळा, एन्गिडीच्या नावावर नकोसा विक्रम

राजस्थानची २१६ धावांपर्यंत मजल

फोटो सौजन्य - IPL/BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामात ऐतिहासीक शारजाच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला राजस्थानच्या वादळी खेळीचा फटका बसला. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि अखेरच्या षटकांत जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे राजस्थानने सामन्यात २१६ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुन्गिसानी एन्गिडीने टाकलेलं अखेरचं षटक चेन्नईला चांगलंच महागात पडलं.

पहिल्या दोन चेंडूंवर षटकार, यानंतर लागोपाठ दोन नो-बॉलवर षटकार, एक वाईड आणि अखेरच्या ३ चेंडूंवर एकेरी धाव अशा पद्धतीने एन्गिडीने ३० धावा दिल्या. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महाग शेवटचं षटक टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत एन्गिडीला पहिलं स्थान मिळालं आहे. याआधी अशोक दिंडा आणि ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.

एन्गिडीने ४ षटकांत ५६ धावा देत १ बळी घेतला. चेन्नईच्या इतर गोलंदाजांनाही आज चांगलाच मार पडला. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर ५५ तर रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर राजस्थानच्या फलंदाजांनी ४० धावा कुटल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 9:45 pm

Web Title: ipl 2020 lungi ngidi bowled expensive 20th over in ipl equals with unwanted record psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : “फलंदाजांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे की…”; मिलरची विकेट पाहून सचिनने करुन दिली आठवण
2 IPL 2020 : संजू सॅमसनचा CSK ला दणका, झळकावलं विक्रमी अर्धशतक
3 IPL 2020 : राजस्थानच्या फलंदाजांकडून पियुष चावलाची धुलाई
Just Now!
X