29 November 2020

News Flash

मातबरांचे भवितव्य अधांतरी

पुढील ‘आयपीएल’ हंगामासाठी गंभीर निर्णय घेऊ; चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापनाचा इशारा

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

‘आयपीएल’च्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे अपयश प्रकर्षांने समोर आले आहे. १० सामन्यांपैकी सात सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या चेन्नईचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न जवळपास मावळले आहे. पुढील हंगामाला सामोरे जाताना संघाच्या भवितव्याच्या दृष्टीने काही गंभीर निर्णय निश्चितपणे घ्यावे लागतील, असा इशारा चेन्नई सुपर किंग्जच्या संघ व्यवस्थापनाने दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

संघाच्या कामगिरीबाबत चेन्नई संघ व्यवस्थापन अत्यंत निराश आणि असमाधानी असल्याची माहिती मिळत आहे. चेन्नईच्या धोनी युगाची समाप्ती होऊन ‘आयपीएल’ २०२१मध्ये नवा संघ अवतरेल का? जुन्या खेळाडूंवर विश्वास प्रकट करणाऱ्या धोनीच्या दृष्टिकोनापलीकडे चेन्नई संघ विचार करील का? अशा काही प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देऊ शकेल. मात्र पुढील हंगामाच्या दृष्टीने काही गंभीर निर्णय घ्यावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले.

प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनेही संघाच्या कामगिरीबाबत असमाधान प्रकट केले आहे. ‘‘गेल्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास पहिल्या वर्षी आम्ही जिंकलो होतो, गतवर्षी अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करल्याने उपविजेतेपद मिळाले होते. संघातील खेळाडूंची वये वाढल्याने तिसरे वर्ष कठीण जाईल, असा अंदाज होता. संयुक्त अरब अमिरातीमधील ‘आयपीएल’ने ते सिद्ध केले,’’ असे फ्लेमिंगने म्हटले होते.

‘आयपीएल’मधील सर्वात वयस्क खेळाडूंचा संघ म्हणून चेन्नईकडे पाहिले जाते. युवा खेळाडूंची किंमत मोजून अनुभवी खेळाडूंवर विसंबून राहण्याची धोनीची पद्धती यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये पूर्णत: अपयशी ठरली आहे, असे सूत्रांनी सांगितले. माजी सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांतनेही धोनीवर टीका करताना म्हटले की, ‘‘धोनीच्या मताशी मी पूर्णपणे असहमत आहे. तो नेहमीच प्रक्रियेविषयी बोलत असतो. परंतु मुळात त्याची संघनिवडीची प्रक्रियाच चुकत आहे. त्यामुळेच चेन्नई यंदा गुणतालिकेच्या तळाला दिसत आहे.’’

पुढील ‘आयपीएल’ हंगामासाठी नव्याने लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे का, हे अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे नव्याने संघबांधणीसाठी उत्सुक असलेल्या चेन्नईला या निर्णयाचीही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुखापतीमुळे ड्वेन ब्राव्हो ‘आयपीएल’मधून बाहेर

दुबई : दुखापतीमुळे चेन्नई सुपर किं ग्जचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला ‘आयपीएल’मधून माघार घ्यावी लागत आहे. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे ३७ वर्षीय ब्राव्हो दिल्ली कॅ पिटल्सविरुद्धच्या सामन्यात अखेरचे षटक टाकू  शकला नव्हता. सहा सामन्यांत खेळलेल्या ब्राव्होने फक्त सात धावा के ल्या असून, सहा बळी मिळवले आहेत. १० सामन्यांपैकी सात सामने गमावल्यामुळे चेन्नईचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 12:21 am

Web Title: ipl 2020 make a serious decision for the next ipl season csk team management warning abn 97
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: राजस्थान, हैदराबादसाठी विजय अत्यावश्यक
2 IPL 2020 : विराट कोहलीने गाठला मैलाचा दगड, RCB गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर
3 IPL 2020 : अबु धाबीत मोहम्मद सिराजची स्वप्नवत कामगिरी
Just Now!
X