22 January 2021

News Flash

IPL 2020 : तीन बळी घेत जसप्रीत बुमराहचा विक्रम, दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत मिळालं स्थान

३ बळी घेत दिल्लीच्या डावाला पाडलं खिंडार

फोटो सौजन्य - IPL.com

आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरीचं सत्र सुरुच ठेवलं आहे. दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने दिल्लीविरुद्ध सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करत दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कुल्टर-नाईट आणि चहर यांनी भेदक मारा करत दिल्लीच्या संघाला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही.

जसप्रीत बुमराहने ४ षटकांत १७ धावा देत ३ बळी घेतले. याचसोबत अखेरचं षटक टाकताना बुमराहने रबाडाला धावबादही केलं. या कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत बुमराहला स्थान मिळालं आहे. एका सामन्यात सर्वाधिकवेळा ३ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची बुमराहची ही १३ वी वेळ ठरली आहे.

ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस आणि हर्षल पटेल या ३ फलंदाजांना बुमराहने माघारी धाडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 5:35 pm

Web Title: ipl 2020 mi vs dc jasprit bumrah takes 3 wickets creates record psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 Video: सूर्यकुमारने घेतलेला धवनचा अफलातून झेल पाहिलात का?
2 MI vs DC : मुंबई आणि दिल्लीनं ‘या’ पाच प्रमुख खेळाडूंना दिला आराम
3 IPL 2020 : ९ गडी राखत मुंबईचा दणदणीत विजय, दिल्लीसाठी प्ले-ऑफचं आव्हान खडतर
Just Now!
X