29 November 2020

News Flash

IPL 2020: हैदराबादचा संदीप शर्मा चमकला; मोडला झहीर खानचा विक्रम

रोहित, डी कॉकला स्वस्तात धाडलं माघारी

संदीप शर्मा (फोटो- IPL.com)

मुंबईविरूद्धच्या ‘करो वा मरो’च्या सामन्यात हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. गेल्या काही सामन्यात हैदराबादने आव्हानाचा पाठलाग करताना चांगली कामगिरी केली असल्याने कर्णधार वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय आघाडीचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने सार्थ ठरवला. मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांना पॉवर-प्लेच्या षटकांमध्येच त्याने माघारी धाडलं.

दुखापतीनंतर संघात परतलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा केवळ ४ धावा काढून तिसऱ्याच षटकात झेलबाद झाला. त्यानंतर डावाच्या पाचव्या षटकाला क्विंटन डी कॉकने दमदार सुरूवात केली होती. पहिल्या ३ चेंडूवर डी कॉकने १ चौकार आणि २ षटकार हाणले होते, पण चौथ्या चेंडूवर बॅटची कड लागून तो त्रिफळाचीत झाला. रोहित आणि डी कॉक या दोघांनाही संदीप शर्मानेच माघारी धाडले. याचसोबत ५३ बळींसह संदीप पॉवर-प्लेच्या षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. ५२ बळी घेत यादीत अव्वल असलेल्या झहीर खानला त्याने मागे टाकले.

दरम्यान, मुंबईच्या संघाने जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या दोघांना आजच्या सामन्यात विश्रांती दिली. त्याजागी जेम्स पॅटिन्सन आणि धवल कुलकर्णीला Playing XI मध्ये स्थान मिळालं. तर रोहितचं संघात पुनरागमन झालं. त्याने जयंत यादवची जागा घेतली. याशिवाय हैदराबादच्या संघातही प्रियम गर्गला अभिषेक शर्माच्या जागी स्थान मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 8:39 pm

Web Title: ipl 2020 mi vs srh sandeep sharma becomes highest wicket taker in powerplay overtakes legendary pacer zaheer khan vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: हैदराबादचा Playoffs मध्ये दिमाखदार प्रवेश; मुंबईला १० गडी राखून केलं पराभूत
2 IPL 2021 साठीचं Auction कसं असेल? सौरव गांगुलीने दिली मोठी अपडेट
3 बाबांची हाफ सेंच्युरी ! अजिंक्यच्या मुलीने असा साजरा केला आनंद…हा व्हिडीओ जरुर पाहा
Just Now!
X