अबु धाबीच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेत ख्रिस गेलने तुफान फटकेबाजी केली. मैदानाच्या चौफेर चौकार-षटकारांचा पाऊस पाडत ख्रिस गेलने ९९ धावा केल्या. अखेरच्या षटकांत शतक पूर्ण करण्याची संधी आलेली असताना जोफ्रा आर्चरच्या यॉर्कर चेंडूवर गेल त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. पहिल्या षटकापासून मैदानावर तळ ठोकत राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करण्याचं काम गेलने केलं. परंतू केवळ एका धावेने शतकाची संधी हुकल्याने गेलचा संताप अनावर झाला आणि त्याने रागात मैदानातच बॅट फेकली. पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान, नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरने आपला स्पर्धेतला आतापर्यंतचा चांगला फॉर्म कायम ठेवत पहिल्याच षटकात पंजाबच्या मनदीप सिंहला माघारी धाडलं. मात्र यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेलने लोकेश राहुलला उत्तम साथ देत राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोन्ही फलंदाजांनी राजस्थानच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा उचलत चौफेर फटकेबाजी केली. विशेषकरुन ख्रिस गेलने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलंच दडपणात आणलं. केलं. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी करत सामन्यावर वर्चस्व राखलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : नाद करा पण…ख्रिस गेलचा ‘भीमपराक्रम’, टी-२० क्रिकेटमध्ये १ हजार षटकारांची नोंद