26 February 2021

News Flash

0, 0, W, W, 0, 0, 0, 0, W IPL मध्ये सिराजची विक्रमी कामगिरी

KKR ची आघाडीची फळी कोलमडली

फोटो सौजन्य - IPL

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची आयपीएलच्या तेराव्या हंगामातली स्वप्नवत कामगिरी सुरुच आहे. अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात RCB च्या गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. कोलकात्याचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतू RCB च्या गोलंदाजांनी भेदक मारा करत KKR च्या आघाडीच्या फळीतल्या गोलंदाजांना दणके दिले.

या सर्वांमध्ये उठून दिसला तो मोहम्मद सिराज. सुरुवातीच्या स्पेलमधली दोन षटकं निर्धाव टाकत ३ बळी घेण्याचा विक्रम मोहम्मद सिराजने आपल्या नावावर केला. आयपीएलच्या सामन्यात दोन मेडन ओव्हर टाकणारा सिराज पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

राहुल त्रिपाठी, नितीश राणा आणि टॉम बँटन या फलंदाजांना सिराजने माघारी धाडलं. RCB च्या या भेदक माऱ्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज पुरते भांबावलेले दिसले. नवदीप सैनीनेही शुबमन गिलला माघारी धाडत KKR च्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 8:07 pm

Web Title: ipl 2020 mohammad siraj becomes first bowler to bowl 2 maiden overn in ipl match psd 91
Next Stories
1 IPL 2020 : CSK चा पाय आणखी खोलात, ब्राव्होची दुखापतीमुळे माघार
2 IPL 2020 : पंजाबविरुद्ध पराभवानंतर दिल्लीच्या गोटात खळबळ, कर्णधार श्रेयस अय्यरकडून कबुली
3 “IPL संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या नाहीतर…”; मनसेचा डिस्ने हॉटस्टारला इशारा
Just Now!
X