News Flash

IPL 2020 : धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा, जवळच्या मित्राचा विक्रम मोडला

आठवडाभराच्या अंतराने धोनी पुन्हा मैदानावर

SAMUEL RAJKUMAR / Sportzpics for BCCI

महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. यानंतर युएईत सुरु असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनी सहभागी झाला आहे. आतापर्यंतच्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. गुणतालिकेत हा संघ तळाशी आहे. त्यातच गेल्या दोन सामन्यांत धोनी फलंदाजीसाठी उशीरा येत असल्यामुळे चेन्नईचे चाहते नाराज आहेत. मात्र धोनीने अशा परिस्थितीतही एक विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आता धोनीच्या नावावर जमा झाला आहे. सनराईजर्स हैदराबादविरुद्धचा सामना धोनीचा आयपीएलमधला १९४ वा सामना ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी आणि रैना चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सदस्य आहेत. २०१६ आणि २०१७ या दोन हंगामात चेन्नई संघावर कारवाई करण्यात आली होती. ज्यावेळी धोनी पुणे संघाकडून तर रैना गुजरातकडून खेळला. मात्र यंदाच्या हंगामात रैनाने खासगी कारणांमुळे माघार घेतलेली असल्यामुळे धोनीला आपल्या जवळच्या मित्राचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 7:04 pm

Web Title: ipl 2020 ms dhoni becomes most ipl cap player break ssuresh raina 193 match record psd 91
Next Stories
1 IPL 2020 : तुजविण सख्या रे ! साक्षीला येतेय धोनीची आठवण
2 रैना, हरभजनसाठी संघाची दार कायमची बंद? CSK मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
3 IPL 2020 : पोलार्ड-पांड्या समोर असताना अखेरचं षटक ऑफ-स्पिनरला?? सचिनने मारला कपाळावर हात
Just Now!
X